३६१. ज्या कारणें साधिती साधनें
ज्या कारणें साधिती साधनें । त्या गोकुळीं खेळणें भाग्यनिधी ॥ १ ॥
तें रूप वैकुंठ ब्रह्मादिकां पूज्य । योगियांचे भज्य आत्मलिंग ॥ २ ॥
न पडे आगमा नाहीं त्यासि सीमा । तो गौळियांच्या कामा धांवे कृष्ण ॥ ३ ॥
निवृत्तिचे धन ब्रह्म हें रोकडे । गौळणी त्या कोडें खेळविती ॥ ४ ॥