३६२. सुमना सुवासु तैसा ऋषीकेशु

सुमना सुवासु तैसा ऋषीकेशु । आपण सौरसु जनीं इये ॥ १ ॥
मनादि इंद्रियें चैतन्याभीतरी । अंतर्बाह्य हरी एक नांदे ॥ २ ॥
हरीवीण दूजें शून्य त्रिभुवन । आपण जीवन तयामाजी ॥ ३ ॥
निवृत्ति सुमन जनवनसखा । वेदमुखें लेखा ऐसा आहे ॥ ४ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *