३६३. निमाली ते निशी पळाला तो दीन
निमाली ते निशी पळाला तो दीन । प्रपंचाचे भान लोपिन्नले ।। १ ॥
हरिवीण नाहीं सूत्रधारी रूप। वासना संकल्प उपटिला ॥ २ ॥
तोडियेलें सूत्र उगविला गळा । अखंड सोहळा ब्रह्मरूप ॥ ३ ॥
निवृत्ति निःसंग परब्रह्म चांग। फेडियला पांग गुरुराजें ॥ ४ ॥