३६४. रूपस रूपडें दिसे चहूंकडे
रूपस रूपडें दिसे चहूंकडे । मन तेथे कोडें गोवियेलें ॥ १ ॥
जाला पैं उलट सांपडली वाट । श्रीवैकुंठ पेठ आम्हांमाजी ॥ २ ॥
गेला पैल तीरा आणिले कापुरा। दीप एकसरा पाजळिला ॥ ३ ॥
निवृत्तिचे दीप सद्गुरू पुरविले । भांडवल जालें हरिरूप ॥४॥