३६५. नाहीं काळ वेळ नाहीं तो नियम
नाहीं काळ वेळ नाहीं तो नियम । सर्व यमनियम बुडाले रया ॥ १ ॥
हरिरूप सर्व गयनीप्रसाद । सर्व हा गोविंद आम्हां दिसे ॥ २ ॥
अच्युत अनंत नारायण हरी । नाम चराचरी विस्तारलें ॥ ३ ॥
निवृत्ती सफळ गयनि वोळला । सर्व काळ झाला हरीरूप ॥ ४ ॥