३६९. भांडवल हरि पैल द्वीपांतरी
भांडवल हरि पैल द्वीपांतरी । हरिरूप चारी दिशा पूर्ण ॥ १ ॥
न दिसे तें भान दृश्य द्रष्टा हरि । सर्व घरोघरीं आत्माराम ॥ २ ॥
ज्ञानेसि विज्ञान गेले अनाठाया। हरीरूप छाया आम्हांवरी ॥ ३ ॥
निवृत्ति दिधला नामेरूपें दिसे । सर्व हरी असे तेजोमय ॥ ४ ॥