३७१. शिव शांती तेजें रवितेज बिंबे

शिव शांती तेजें रवितेज बिंबे । जीव शिवा बीजे समतेज ॥ १ ॥
तैसें तुझें ज्ञान जालेरें हें काज। केशवी विराज चिर्त जालें ॥ २ ॥
समाधीचें रूप रूपासि आलें काह्या । पसरोनी बाह्या देत क्षेम ॥ ३ ॥
प्रवृत्ति निवृत्ति दोहींचे तटाक । उतरलासि एक शुद्धोदकें ॥ ४ ॥
क्षिरनिरहंसी जाला तुझा स्वादु । अवघाचि गोविंदु नांदे देहीं ।। ५ ।।
निवृत्ति संपत्ति आलिया पै हातां । तत्त्वी तत्त्वे नित्यता उलघा तुझा ॥ ६ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *