३७५. छेदिला समूळ प्रपंच विव्हळ
छेदिला समूळ प्रपंच विव्हळ । तारक गोपाळ भवनिधी ।। १ ।।
नावाडा नाटकु उतरील तीरा । जन्म येरझारा एके खेपे ॥ २ ॥
नाहीं तेथे मोल नाहीं तो विकरा । आपणचि सैरा हिंडतुसे ॥ ३ ॥
निवृत्तिने तीर टाकिलें पैं सार । जन्म येरझार तोडियेली ॥ ४ ॥