०२ विमानी बैसली विठ्ठल सुखमूर्ती
विमानी बैसली विठ्ठल सुखमूर्ती । घेतला निवृत्ति मध्यभागी ॥ १ ॥
राही रखुमाई बैसले सुरगण । उठलीं विमानें गंधर्वांची ॥ २ ॥
गोपाळांचे भार उठले तातडीनें । चालिली विमानें सुरवरांची ॥ ३ ॥
आतां त्वरें चला तुम्ही सप्तशृंगा। कार्य हे गोविंदा सिद्धि न्यावें ॥ ४ ॥
आदिमाया तेथे होईल दर्शन। संत साधुजन भेटतील ॥ ५ ॥
नामा म्हणे धन्य तुझ्यायोगें हरी । तीर्थयात्रा सारी घडली आम्हां ॥ ६ ॥