०३ टाळ हे मृदंग गायन पुढती

टाळ हे मृदंग गायन पुढती । रंजविती निवृत्ति अवघेजण ॥ १ ॥
गीतार्थ करिती योगी मुनिजन । रंजविती मन निवृत्तिचें ॥ २ ॥
आत्मसुख एक बोलती बोलींणी । ज्ञानराज मनीं आठवतो ॥ ३ ॥
ज्ञानराजें आमुचे निवविले डोळे । आतां ऐसे खेळे नाहीं कोणी ॥ ४ ॥
ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी। आतां ऐसी सखी नाहीं कोणी ॥ ५ ॥
नामा म्हणे स्वामी सांगतां प्रमाण । ऐकता श्रवण खेद वाटे ॥ ६ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *