०५ जें जें सुख आम्हीं अनुभविलें मना
जें जें सुख आम्हीं अनुभविलें मना । त्याचा नारायणा आठव होतो ॥ १ ॥
ऐसे पदोपदीं निवृत्तिराज कष्टी । कोणकोणाच्या गोष्टी आठवाव्या ॥ २ ॥
ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचें जाणें । केलें नारायणें उफराटें ॥ ३ ॥
उफराटें फार कळलें माझे मनीं । वळचणीचें पाणी आढ्या गेलें ॥ ४ ॥
अवघ्यापरिस कष्टी केलें मुक्ताईनें । कांहीच बोलणें घडलें नाही ॥ ५ ॥
नामा म्हणे विठोबा ऐकशी बोलणें । अवघियांची मनें कळवळती ॥ ६ ॥