०६ गहिनीनाथें मज सांगितलें सार

गहिनीनाथें मज सांगितलें सार । केली ज्ञानेश्वरें व्याख्या त्याची ॥ १ ॥
काढिला शोधून अनुभव मुक्ताईनें । तें ज्ञान सोपानें संपादिलें ॥ २ ॥
अनुभवें निवविला चांगा वटेश्वर । विसोबा खेचर सिद्ध झाला ॥ ३ ॥
त्या ज्ञानें झाला चांगदेव विकळ । त्यागियेली सकळ अविद्या माया ॥ ४ ॥
अज्ञानासी ज्ञान झालें तें सहज । ऐसें निवृत्तिराज आठविती ।। ५ ।।
सप्तशृंगी आले देव सुरगण । उतरिलीं विमानें नामा म्हणे ॥ ६ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *