०९ वंदिली अंबिका निघाले बाहेर
वंदिली अंबिका निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढे होत ॥ १ ॥
गोदातीरीं क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥ २ ॥
म्हणती पांडुरंगें दाविलें स्थळ । निवृत्तिराज विकळ फार झाले ॥ ३ ॥
पंचमीचे दिवशी गेले पंचवटीं । उतरले तटीं गौतमीचे ॥ ४ ॥
नामा म्हणे शेवट केला वनमाळी । रहाती ये स्थळीं निवृत्तिराज ॥ ५ ॥