१०. सुंदर नारायण गौरविला फार

सुंदर नारायण गौरविला फार । केला नमस्कार वैष्णवांनी ॥ १॥
सुरस सर्व तीर्थे आदि पुरातन । केली नारायणे तीर्थयात्रा ॥ २ ॥
विसोबा खेचर परिसा भागवत । अनेक ते संत बैसविले ॥ ३ ॥
मध्ये निवृत्तिराज पांडुरंग पुंडलिक । पाहती कौतुक गोमतीचें ॥ ४ ॥
दशमीचे दिवशी केले तें प्रस्थान । विधि नारायण सांगतसे ।। ५ ।।
नामा म्हणे श्रीरंगा गौरविले सकळ । झालासे विकळ निवृत्तिराज ॥ ६ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *