१२. आपुलिया अंगें साहित्य श्रीरंगें

आपुलिया अंगें साहित्य श्रीरंगें । पूजियेले सांग संतसाधू ॥ १ ॥
निवृत्तिदेवें केली विठोबाची पूजा । उभारिल्या ध्वजा पताकांच्या ॥ २ ॥
पश्चिमेसी स्थळ अनादि समूळ । उघडिली शीळ समाधीची ॥ ३ ॥
म्हणती योगेश्वर अनादि या शेजा। चिद्रत्ने ती पूजा केली असे ॥ ४ ॥
नामा म्हणे देवा जागा निरंजनीं । युगादि हे धुनी धुपतीये ॥ ५ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *