१५. निवृत्तिदेवासाठी स्फुंदती ऋषीश्वर
निवृत्तिदेवासाठी स्फुंदती ऋषीश्वर । लाविला पदर डोळियांसी ॥ १ ॥
गरूडावर पुंडलिकें घातियेला साज । जाती निवृत्ति राज समाधीसी ॥ २ ॥
चालती विमानें वाजतसे घंटा। उठा आतां भेटा अवघेजण ॥ ३ ॥
समाधीभोंवते कुंकुमाचें सडे। पाहाती निवाडे योगीराज ॥ ४ ॥
कीर्तन गजरी गेलीसे मंडळी । बैसली ते पाळी समाधीच्या ॥ ५ ॥
नामा म्हणे पुढे उभे नारायण । आरंभिले नमन निवृत्तिराजें ।। ६ ।।