१७ धूप पंचारती गंधाक्षता वाहती

धूप पंचारती गंधाक्षता वाहती । पूजिला निवृत्ति वैष्णवांनी ॥ १ ॥
प्रेमें आसुवें येती सकळांचिये डोळां । माळ घाली गळां पुंडलिक ॥ २ ॥
निवृत्तिदेवे ग्रंथ केला होता सार। ठेविला समोर विठोबाच्या ॥ ३ ॥
अवघ्या जनालागी केला नमस्कार । उठावले भार वैष्णवांचे ॥ ४॥
गोविंद गोपाळ आले ते सकळ । प्रेमें होती विकळ निवृत्तिराज ।। ५ ।।
केली आचमने पुष्कर्णीचे तटीं । आले उठाउठी समाधीपाशीं ॥ ६ ॥
नामा म्हणे देवा निवृत्तिसारखा योगी । नाहीं आतां जगी दावावया ॥ ७ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *