१९. निवृत्तिराज बैसले समाधी सुचित्त

निवृत्तिराज बैसले समाधी सुचित्त । चिन्मय ते ज्योत उजळली ॥ १ ॥
पुंडलिकें मिठी निवृत्तिच्या गळां । अवघियांच्या डोळा आसुर्वे येती ॥ २ ॥
विठोबाचें हृदय आलेंसे भरून । झांकियेले नयन निवृत्तिराजें ॥ ३ ॥
पुंडलिकें आणिले विठोबासी बाहेर । केला नमस्कार वैष्णवांनी ॥ ४ ॥
राही रखुमाई बैसल्या गहिंवरत । आणिक संत महंत वोसंडती ॥ ५ ॥
नामा म्हणे हरि शुद्धि नाहीं सकळां । घाला आतां शिळा समाधीसी ॥ ६ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *