२१. परिसा भागवत करितसे शोक

परिसा भागवत करितसे शोक । म्हणती देवा दुःख फार झालें ॥ १ ॥
द्वादशी समाधि दिधली निवृत्तिसी । झाले उदासी अवघे जण ॥ २ ॥
देव म्हणे उठा करा आतां पूजा । घालुं पुष्पशेजा समाधीसी ॥ ३ ॥
उठले सकळ होताती विकळ । गेले ते गोपाळ समाधीसी ॥ ४ ॥
घेतली समाधि सव्य वैष्णवांनी । पूजिताती सुमीं समाधीसी ॥ ५ ॥
नामा म्हणे अवघे करा प्रदक्षिणा । चला आचमना पुष्करणींसी ॥ ६ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *