२४. गेले दिगंबर ईश्वर विभूति
गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजी ॥ १ ॥
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानीं । आता ऐसें कोणी होणें नाहीं ॥ २ ॥
सांगतील ज्ञान म्हणतील खूण । नयेची साधन निवृत्तिचें ॥ ३ ॥
परब्रह्म डोळां दावूं ऐसें ह्यणती । कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥ ४ ॥
करतील अर्थ सांगतील परमार्थ । नये पां एकांत सोपानाचा ॥ ५ ॥
नामा म्हणे देवा सांगूनियां कांही। न ये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥ ६ ॥