२५. नानापरि खेद आठविती मना
नानापरि खेद आठविती मना । आतां नारायणा सिद्धि न्यावें ॥ १ ॥
समाधीसी केली आरती पंचारती । राहिली निवृत्ति स्वरूपी तुझ्या ॥ २ ॥
सुखाचें साधन झालीं चौघेजणें । केली नारायणें बोळवण ॥ ३ ॥
पंचक्रोशावरी उभे ठेले भार । केला नमस्कार समाधीसी ॥ ४ ॥
नामा म्हणे आतां जावें पंढरपुरा। समाधींचा सारा विधि झाला ।। ५ ।।