०६३ निगम आगम वेदादिक सम

निगम आगम वेदादिक सम ।
श्रुतीचा उपक्रम हरपला ।।१।।
तें रूप साजिरें नंदाचे गोजिरें ।
यशोदा श्रीधरें प्रेमभेटी ।।२।।
जेथें हें वाग्वाट शून्य तो निघोट ।
प्रत्यक्ष वैकुंठ तें गोपवेष ।।३।।
निवृत्तितडाग निवांत सम्यक ।
सर्व रुपें एक आत्माराम ।।४।।

सरलार्थ:

जेथे वेद, शास्त्र व अन्य उपवेदादिक सम होऊन श्रुति-उपनिषदांचा प्रभुदर्शनाचा-साक्षात्काराचा उपक्रम हरून गेला आहे ।।१।। ते सुंदर रूप नंदाच्या आवडीचे व यशोदेलाही ती भेट प्रेमसुखच देणारी आहे ।।२।। जेथे वाणीची वाट नाहिशी होते व जो संपूर्ण परिपूर्णत्वाने भरलेला आहे तो वैकुंठ स्वरूप परमात्मा प्रत्यक्ष गोपवेष धारण करून गोकुळात खेळत आहे ।।३।। सर्वांभूती एकरूप असलेल्या आत्मारामाचे हे चांगले श्रीकृष्णरूप निवृत्तिचे निळे सरोवर आहे. तेथे ते निवांत आहेत. (राजहंसाचे राहणे सरोवरांतच असते) ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *