०७३ गगनीं उन्मनी वेदासी पडे मौनी

गगनीं उन्मनी वेदासी पडे मौनी ।
श्रुतीची काहणी अरुती ठाके ॥ १ ॥
तें ब्रह्म साबडे नंदाचिये घरीं ।
वनी गाई चारी गोपवेषें ॥ २ ॥
न पाहातां होय ब्रह्मांड पीठिका ।
ते युग क्षणिका हारपे रया ॥ ३ ॥
निवृत्तिदैवत कृष्ण परिपूर्ण ।
सर्वत्र जीवन सर्वीं वसे ॥ ४ ॥

सरलार्थ:

महाकाश स्वरूप मनातीत अवस्थेत वेदहि गप्प बसतात मुके होतात व उपनिषदांची गोष्ट तर अलिकडेच राहते ।।१।। ते परब्रह्म विशुद्धभावाने सरळपणाने नंदाच्या घरात खेळत आहे व गुराख्याच्या वेषाने रानावनांत गाई चारीत फिरत आहे ।।२।। अरे राजा, कांहि पाहता जे अधिष्ठान आहे. तो युगा एवढा काळ जेथे क्षणांतच ब्रह्मांडाचे आसन नाहिसा होतो ।।३।। तो परिपूर्ण कृष्ण निवृत्तिचे दैवत आहे. त्यामुळे त्याचे – जीवन सर्व ठिकाणी व सर्वांत राहते ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *