०८० निरालंब देव निराकार शून्य

निरालंब देव निराकार शून्य ।
मनाचेंही मौन हारपलें ॥ १ ॥
तें रूप साबडें शंखचक्रांकित ।
यशोदा तें गात कृष्णनाम ॥ २ ॥
मौनपणें लाठें द्वैत हें न साहे ।
तें नंदाघरीं आहें खेळेमेळें ॥ ३ ॥
निवृत्ति आकार ब्रह्म परिवार ।
गोकुळीं साकारमूर्ति ब्रह्म ॥ ४ ॥

सरलार्थ:

श्रीहरि – परमात्मा – देव हा आश्रय व आकाररहित आणि शून्यस्वरूप असून तेथे मनाचे हि मौन नाहिसे होते ।।१।। (वाणीचे मौन तसे मनाचे मौन फारच कठीण व ते हि जेथे नाहिसे होते ते) शंख चक्राने चिन्हीत सरळ भोळे रूप पाहुन कृष्ण वेषात यशोदा गात होती ।।२।। मौनाने जे मोठे असून द्वैत जेथे सहन होत नाही. ते नंदाच्या वाड्यात खेळीमेळीने राहत आहे ।।३।। त्या ब्रह्माचे स्वरूप हा निवृत्तिचा परिवार आहे. ते मूर्तिमंत ब्रह्म गोकुळांत साकारले आहे ।।४।।

भावार्थ:

जो परमात्मा कोणावर अवलंबून नाही जो निराकार आहे. त्याच्या ध्यानाने मनाचे मौन्य हरपते. शंख चक्र ही आयुधे घेऊन ते कृष्ण रूप सहज सगुणात्मक साकार झाले आहे. ते कृष्णरुप निरागस होऊन हातात शंखचक्रनिरागसअवतरले आहे. त्याला माता यशोदा त्याचे नामगायन करुन रिझवते. निर्गुणरुपातील मौन स्तब्धता सोडुन ते गोपी समावेत खेळ खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या गोकुळात अवतरेल्या कृष्ण रुपाचा मी आश्रय घेतला आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *