२३० आम्ही चकोर हरि चन्द्रमा

आम्ही चकोर हरि चन्द्रमा ।
आम्ही कळा तो पूर्णिमा ॥१॥
कैसा बाहिजु भीतरी हरि ।
बिंबे बिंबला एकसूत्री ।।२।।
आम्ही देही तो आत्मा ।
आम्ही विदेही तो परमात्मा ॥३॥
ऐक्यपणें सकळ वसें ।
द्वैतबुद्धि कांही न दिसे ॥४॥
निवृत्ति चातक इच्छिताहें ।
हरिलागीं बरें तें पाहे ॥५॥

सरलार्थ:

गुरुगहिनी कृपेने कशी ज्ञानोत्तर प्रेमभक्ती प्राप्त झाली आहे ते पहा. आम्ही चकोरपक्षी असून श्रीहरि हा चंद्र किंवा आम्ही कला असून तो परमात्मा पौर्णिमा आहे ।। तो कसा आंत बाहेर एक सूत्रात आपल्या स्वरूपानेच साकार झाला आहे ।।२।। आम्ही देह तर तो आत्मा-देही व आम्ही विदेही तर तो परमात्मा आहे ।।३।। एकपणाने सर्ववस्तूत राहतो. त्यामुळे द्वैतबुद्धि कांहीच दिसत नाही. निवृत्ति हा चातक पक्षी होऊन हरि प्राप्तिची इच्छा करीत असून त्यासाठी ते वर- हरिकडे पाहत आहे ॥४॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *