२३४ पूर्विलिये क्षेत्री पूर्वज पुरता

पूर्विलिये क्षेत्री पूर्वज पुरता । तरिच अरुता हरि दिसे ॥ १ ॥
सर्वभावीं नाम वोळलें सर्वदां । अखंड गोविंदा गांऊ गीति ।। २ ।।
शामतनु हरि प्रभा भानु । तो माझा जीवनु हरि आम्हा ॥ ३ ॥
निवृत्ति आवडे सद्गुरु गयनी । चित्त नारायणीं तल्लीनतां ॥ ४ ॥

सरलार्थ:

श्रीहरिच्या पूर्वक्षेत्रांत निर्गुण स्वरूपात पूर्वी पूर्ण अनुभव आला म्हणूनच आता अलिकडे हरि दिसत आहे ||१|| नामच सर्वभावाने सर्वकाळ प्रसन्न झाले आहे. त्यामुळे आम्ही आता अखंडच गोविंदाचे गुणगाण करू ||२|| सावळ्या वर्णाचा श्रीहरि सूर्यप्रभे सारखा दिसतो तो श्रीहरिच आमचे जीवन होऊन बसला आहे. ।।३।। निवृत्तिनाथास गहिनी आवडतो त्यामुळे त्याचे चित्त नारायण स्वरुपातही तद्रूप झाले आहे ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *