२४२ आशा पैं पाशा नेघों पैं चित्ती
आशा पैं पाशा नेघों पैं चित्ती । एका नामें तृप्ति सर्वकाळ ॥ १ ॥
राम राम नामें आम्हांसी अखंड । नेणो पैं पाषांड नानामतें ।। २ ।।
हरिनाम वाचे सारमंत्र आम्हां । अखंडित प्रेमा वसे चित्तीं ।। ३ ।।
निवृत्ति संचित गयनी पैं सांगे। एका श्रीहरि जोडी करा ॥ ४ ॥
सरलार्थ:
आम्ही आता आशा व हव्यास चित्तात घेतच नाही. कारण एका नामानेच आमची सर्व काळ तृप्ती झाली आहे ।। १ ।। आम्हाला अखड रामराम हे नामच आवडते. पाखंड्याची नाना मते आम्ही जाणत नाही ।। २ || भगवंताचे नाम वाणीत येणे हाच आमचा सार रूप मंत्र आहे. त्याने चित्तात अखंड प्रेम राहत आहे ।। ३ ।। सचित्त एकाग्र चित्त अशा निवृत्तिस गहिनी सांगत आहेत एका श्रीरंगाची प्राप्ती करून घ्या ॥ ४ ॥