२५३ परापवाद कामी परनिंदा झाली

परापवाद कामी परनिंदा झाली । ऐकतां निजमनीं कृष्ण जपे ।। १ ।।
हरि हरि म्हणे नायके ते मात । द्वैत तया आंत नेघे बापा ।। २ ।।
दुजियाची निंदा अपवाद सदा । वाचें गोविंद जप करी ॥ ३ ॥
निवृत्ति तत्पर नाइके ते शब्द । नित्यता गोविंद जपतसे ॥ ४ ॥

सरलार्थ:

दुसऱ्याचे दोष व दुसऱ्याची निंदा कानाने ऐकण्या पेक्षा, आत्ममौन अथवा कृष्ण नामाचा जपच करावा || १ || हरि हरि म्हणतांना दुसरी गोष्टच ऐकत नाही. तो आपल्या आंत द्वैत घेतच नाही. ।।२।। सदैव दुजियांची निंदा व अपवाद बोलण्यापेक्षा वाचेने गोविंदाचा जप करावा ।। ३ ।। निवृत्तिनाथ म्हणतात त्या संबंधी मी स्वतःच सावध असून निंदा वा अपवादाचे शब्द ऐकत नाही. तर अखंड गोविंदाचा जप करीत असतो. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *