२५५ चांगया लाधले नामया दिधले

चांगया लाधले नामया दिधले । दिधलें विठ्ठलें हरिकृपा ।। १।।
प्रेमाचे पुतळे भीमातीरा आले । जयजयकार केले हरिभक्तीं ॥ २ ॥
वैकुंठ आपण भक्तांमाजि खेळे । पुंडलिक लीळे खेळतुसे ।। ३ ।।
निवृत्ति निवाला आनंदे नाचतु । उन्मनी भरितु ज्ञानदेव ॥ ४ ॥

सरलार्थ:

चांगदेवास मुक्ताबाईकडून लाभले ते भाग्य नामयाचा चिरंजीव विठा त्याच्या पदरांत श्रीहरि कृपेने पडले ।। १ ।। ते सर्व संत, श्रीहरी प्रेमाचे मुर्तिमंत पुतळे भीमेच्या तिरावर एकत्र आले व त्यांनी हरि भक्तिचा जयजयकार केला ।।२।। स्वतः वैकुंठस्वरूप श्रीहरी भक्ता मध्ये खेळु लागला व पुंडलिकही लीलेने त्यांच्यात खेळु लागला ।।२।। त्यासुखाने झालेला निवृत्ती आनंदाने नाचु लागला व ज्ञानदेव उन्मनी अवस्थेने संपन्न झाला. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *