श्री गुरु निवृत्तिनाथांची आरती

आरति निवृत्तिनाथा । मुक्तिशीग परमार्था ।
आज्ञांकित ज्ञानदे । वृत्तिरहित अवस्था ।। १।।
ब्रह्मगिरी ब्रह्मदीप । गुरू गहिनी समीप ।
त्यांनी केला अनुग्रह । सर्व जीवा मायबाप ||२||
सदाशिव अवतार । जडजीवा भवपार ।
समाधी त्र्यंबक स्थळ । केला जीवाचा उद्धार ||३||
ज्योतिर्लिंग ते त्र्यंबक । देई भक्तिभावा हाक |
मुक्तिदान भक्तिपंथे | हाचि सिद्धांत एक ।।४।।
ब्रह्ममीस्थिती सदावास । समूळ वासना नाश ।
। त्रिकुट ते सारी मागे । नित्य कृष्ण भक्ति ध्यास ||५||
अनाथा धरिले हाती । दिली जीवना गती ।
सर्वस्वे सांभाळिले । द्यावा जगन्नाथा प्रीति ||६||

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *