३३९ निराकारी घर आकारले व्यर्थ
निराकारी घर आकारले व्यर्थ । सांगतां परमार्थ न बुझे हरी ॥ १ ॥
काय करु माये कैसा हा गोवळू । सरसु कळु नाही म्हणे ।। २ ।।
देहाचा दीप की नाहीं म्हणे माया । तेजाकारे छाया हाचि घेतु ।। ३ ।।
निवृत्तिचे सार प्राणापानीं स्थिर । मनें चराचर आराधिलें ॥ ४ ॥
सरलार्थ:
निराकार स्वरूपांत हे घर विनाकारणच साकार झाले आहे. पण हे सत्य सांगतांना हरि कळत नाही ।।१।। अग मैत्रिणी काय करू हा गोपाळ कसा आहे. सरळ व सुफळ नाही म्हणतो ||२|| देहातील दीप असून तो नसून मायाच आहे म्हणतो. तेजाच्या आकाराने हाच ती छाया देत असतो ||३|| निवृत्तिचे सार प्राण व अपानवायुत स्थिर आहे व त्याने मनाने चराचर विश्वात्मक ईश्वरांची उपासना केली आहे ॥४॥