३७६. राम नाम वाचे तोचि एक धन्य
राम नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचेंचि शुद्ध पुण्य इये जनीं ॥ १ ॥
रामनामांकित नित्य मंत्र ज्याचे । दहन पापाचे एका नामें ॥ २ ॥
ऐसा जो नित्यता पढतसे नाम। नाही तया सम दुजें काहीं ॥ ३ ॥
निवृत्ति अव्यक्त रामनाम जपे । नित्यता सोहपें रामनाम ॥ ४ ॥